कोरोनाचा नवा विक्रम; नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त

0

नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात अक्षरश: कहर माजविला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या २७ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मात्र समाधानकारकबाब म्हणजे मागील २४ तासात देशात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. मागील २४ तासात देशात ५५ हजार ०७९ रुग्ण आढळून आले आहे. मात्र ५७ हजार ५८४ रुग्ण एकाच दिवसात बरे होऊन घरी गेले आहे. आजपर्यंत रिकव्हरीचा हा नवा विक्रम आहे.

आणखी एक नवीन विक्रम 

देशात करोना चाचणीचं प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांचं प्रमाणही वाढलं आहे. देशात सध्या तीन कोटींपेक्षा जास्त करोना चाचण्या झाल्या आहेत. भारतानं एका दिवसात करोना चाचणी करण्याचा विक्रम केला आहे. भारतात आतापर्यंत कधीही झाल्या नव्हत्या तितक्या करोना चाचण्या झाल्या आहेत. एका दिवसात भारतानं ९ लाख ९९ हजार ८६४ करोना चाचण्या घेतल्या आहेत. ही आतापर्यंतची देशातील सर्वात जास्त संख्या आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे अधिक आहे. भारतातील रिकव्हरी रेट हा जगापेक्षाही जास्त आहे. जगातील रिकव्हरी रेट ६५ टक्के आहे तर भारतातील रिकव्हरी रेट ७३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. आजच्या घडीला देशातील रिकव्हरी रेट ७३.१८ टक्के आहे. भारतातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २४ टक्के आहे. रिकव्हरी रेटच्या बाबतीत जगाच्या तुलनेत भारतच आघाडीवर आहे. अद्याप कोरोनावरील लस बाजारात आलेली नाही, मात्र तरीही भारतातील रिकव्हरी रेट हा वाखाणण्याजोगा आहे.

देशभरातील २७ लाख २ हजार ७४३ करोनाबाधितांच्या संख्येत, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ६ लाख ७३ हजार १६६ इतकी आहे. १९ लाख ७७ हजार ७८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.