कोरोनाचा दररोज नवीन रेकोर्ड; २४ तासातील आकडेवारीने मोडले सर्व रेकोर्ड

0

नवी दिल्ली: कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भारतात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दररोज मोठी वाढ होत आहे. हे देशासमोरील मोठे संकट आहे. प्रादुर्भाव अधिकच वाढत चालल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना दररोज नव्या विक्रमाची नोंद करत आहे.दरम्यान आत्तापर्यंतच्या कोरोनाबाधितांच्या संख्येने सर्व विक्रम मोडून काढले आहे. गेल्या २४ तासात करोनाबाधितांची संख्या ५० हजाराच्याजवळ गेली आहे. एका दिवसात संपूर्ण देशात ४९ हजार ३१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. २४ तासांत देशात ७४० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रिकव्हरी रेट अधिक असला तरी वाढती संख्या चिंताजनक आहे.

महाराष्ट्रातील आकडेवारी देखील चिंता करायला लावणारी आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ९ हजार ८९५ नवीन रुग्ण आढळले आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १३ लाखांच्याजवळ पोहोचली आहे. १२ लाख ८७ हजार ९४५ रुग्ण संख्या झाली आहे. आतापर्यंत ८ लाख १७ हजार २०९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर चार लाख ४० हजार १३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रातील आकडेवारी देखील चिंता करायला लावणारी आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ९ हजार ८९५ नवीन रुग्ण आढळले आहे.

रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे.

Copy