कोरोनाचा थैमान सुरूच; साडेसतरा लाखांचा टप्पा ओलांडला 

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने कहर माजविला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर अद्यापही लस आलेली नसल्याने चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता १७ लाख ५० हजार ७२४ वर पोहोचला आहे. मागील २४ तासांत देशभरात तब्बल ५४ हजार ७३६ नवे रुग्ण आढळले आहे. तब्बल ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील १७ लाख ५० हजार ७२४ करोनाबाधितांपैकी सध्या ५ लाख ६७ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, ११ लाख ४५ हजार ६३० जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३७ हजार ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने दिलासादायक देखील परिस्थिती आहे.

जुलै या एका महिन्यात भारतामध्ये ११ लाख १० हजार करोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यातील १९ हजार १२२ जणांना मृत्यू झाला आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली.

Copy