Private Advt

कोरोनाकाळात टपाल विभागाने घेतला लोकसेवेचा वसा

भारतातील टपाल सेवा इंग्रजांनी सुरू केल्यानंतर तिच्या आजवरच्या प्रवासात अनेक आमूलाग्र बदल घडत गेले. आजमितीला भारतीय डाक विभागाची व्याप्ती ही जगामध्ये सगळ्यात मोठं आणि सर्वाधिक पोस्ट ऑफिसेसची संख्या असणारं खातं म्हणून आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर फक्त २३,३४४ डाकघरं असणाऱ्या या खात्याची प्रगती दहा पटीने मागच्या सहा दशकांमध्ये झाली आहे. एका पोस्ट ऑफिसच्या खाली साधारणपणे २१ किलो मिटरचा भाग किंवा ७११५ एवढय़ा लोकसंख्येला सेवा पुरवण्याचं काम असतं.
डाक विभाग हा भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो.

कोरोनाकाळात कार्यरत अत्यावश्यक सेवेअंतर्गत काम करणाऱया टपाल खात्याने कोरोनाकाळात महत्वपूर्ण कामगीरी पार पाडीत सर्वसामान्यांच्या मनात आपली प्रतिक्रिया अधिक उंचावली आहे. ग्रा‘मीण भागापासून ते शहरापर्यंत आजही पोस्ट खात्यावर सर्वसामान्यांचा नितांत विश्वास आहे. कोरोनाकाळातील संचारबंदीत खासगी वाहनव्यवस्था, दळनवळनाची इतर साधने पूर्णतः बंद असल्याने टपालविभागाची जबाबदारी वाढली होती.
इंटरनेट युगात पोस्टाचे महत्व  कमी होईल, असे बोलले जात होते मात्र अलीकडे पोस्टाचीच सेवा महत्वपूर्ण ठरली. कोरो काळात केंद्राने पोस्ट सेवेला अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला आहे. लॉकडाऊन असल्याने देशातल्या अनेक ठिकाणी जीवनावश्यक औषधांचा तुटवडा निर्णमान झाला होता. भारतीय टपाल सेवेमाफर्ङ्र्ररत आता अशा भागांमध्ये औषधांचा पुरवठा करण्यात आला. पोस्टाची लाल गाडी प्रत्येकाच्या ओळखीची आहे. रोज रस्त्यांवर भारतीय टपाल खात्याच्या या गाड्या फिरत असतात. संचारबंदीच्या काळात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद होती. त्यावेळी ज्या भागां‘मध्ये वैद्यकीय साहित्य आणि औषधांची सर्वाधिक गरज आहे, तिथपर्यंत या वस्तू पोहचवण्यांच काम टपाल खात्याने पार पाडले. कोव्हीड  – १९ आजाराच्या फैलावाला आळा घालण्यासाठी २४ ‘मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व उदयोग व्यवसाय बंद करून लोकांना घरी थांबण्यास सांगण्यात आलं. ‘मात्र. घोषणा झाल्यानंतर अगदी चारच तासात लॉकडाऊन सुरू केल्याने कोरोनाचा सा‘ना करण्यासाठी सर्वाधिक गरजेच्या असलेल्या हॉस्पिटल्स, औषध निमर्ती कंपन्या आणि पॅथलॉजी लॅब यासारख्या सेवांवरही  माेठा परिणाम झाला.
टपाल खात्याचं देशभर विणलेलं जाळ बघून त्यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आला आहे आणि लॉकडाऊन‘ मध्येसुद्धा   विभागाचं काम सुरू होते. लॉकडाऊन सुरू झाल्यापसून पोस्टाच्या लाल गाड्यांतून ‘माेठ्या शहरात आणि वेगवेगळ्या राज्यां‘मध्ये अत्यावश्यक औषधं, कोव्हिड १९, डासग्नोस्टिक किट्स, एन ९५ ‘मास्क, व्हेंटिलेटर्स इतर वैदयकीय साहित्य अशा सगळ्यांची डिलिव्हरी करायला सुरूवात टपाल खात्याने या काळात केली. देशभरातील नागरिकांवर या काळात तब्बल सहा ‘महिने घरात बसण्याची वेळ आली. तेव्हा सर्व काही ठप्प झाले होते. राज्यात रोज हजारो कोरोनाबाधीत रुग्ण सापडत होते. शहरात भितीचे वातावरण होते. ‘मात्र, दुसरीकडे अशा परिस्थितीतही एकही सुटी न घेता पार्सल, कुरिअर आणि औषधी घरोघरी पोहचवण्याचे का‘म देशभरातील टपाल खात्याने केले आहे.  डॉक्टर्स, पोलीस आणि आरोग्य कर्‘मचाèयाच्या खांद्याला खांदा लावून टपाल खात्यातील  कर्‘मचारी, पोस्ट‘मन, अधिकारी यांनी आपले कर्तव्य बजावत कोविड योद्धा असल्याचे दाखवून दिले आहे.
कोरोना काळात केंद्राने पोस्ट सेवेला अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिल्याने आम्हाला अविरत सेवा देणे गरजेचे आहे. कोरोनाने कोणी पोस्ट कर्‘चारी दगावल्यास सरकारने त्यांच्यासाठी दहा लाखांची ‘मदत जाहीर केली आहे. तसेच हॅडग्लोज, मास्क, फेस  सिल्ड, सॅनिटायझरही पुरविल्याची ‘माहिती डाकविभागात कार्यरत कर्‘मचाऱयांनी दिली.

भारतीय डाक विभाग आजच्या घडीला  e-post आणि  e-bill post , स्पीड पोस्ट, बिजनेस पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, एक्स्प्रेस पार्सल पोस्ट, मीडिया पोस्ट, रिटेल पोस्ट, ग्रीटिंग पोस्ट, स्पीड नेट, इंटरनॅशनल मेल्स आणि इंटरनॅशनल ई.एम.एस. या पोस्टाच्या सेवा चालवतं. भारतीय टपाल खात्याचं सगळ्यात जुनं आणि खेडोपाडी पोहोचलेलं काम म्हणजे त्याच्या आर्थिक सेवांचं आहे. या सेवांमध्ये आपल्या सगळ्यांच्या परिचयाची ‘मनी ऑर्डरङ्क सेवा, इंटरनॅशनल मनीऑर्डर सेवा, पोस्टाची बचत बँक, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर ( (EFT) , तात्काळ मनीऑर्डर सेवा आणि डाक बीमा योजना  (Postal Life Insurance)  या सेवांचा सहभाग आहे.

टपालसेवेवर आमचा विश्वास कोरोना काळात अधिक दृढ झाला आहे. पार्सल, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, औषधे आणि बँक खातेदारांना पैसेही घरपोच वाटप करण्यात आले. फाेन केला की, पोस्टमन पैसै घेऊन घरी येऊन देतो ही सेवा सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी ठरल्याचे ज्येष्ठ नागरिक दिनकर पाटील यांनी सांगीतले.

२०२१ अखेरीस टपाल खात्याचा  िवकास

१.४३ लाख टपाल कार्यालयांमध्ये पोस्टमन मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित, यामध्ये ९८,४५४ ग्रामीण टपाल कार्यालयांचा समावेश

देशभरामध्ये मतदारांचे ओळखपत्र वितरित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग आणि टपाल विभाग यांच्यामध्ये करार

टपाल विभागाची जीपीएस स्थापित १२६३ मेल मोटर सर्व्हिसेस (एमएमएस) वाहने देशभरात कार्यरत

कोविडच्या दुस-या लाटेमध्ये परदेशातून आलेल्या टपालाचे सुलभतेने वितरण करण्यासाठी टपाल विभागाची आपत्कालीन कार्याला मान्यता

टपाल विभागाने यंदा १.६७ कोटी नवीन खाती उघडली; टपाल विभागाच्या कोअर बँकिंग सेवेने जवळपास ८.१९ लाख कोटी रूपयांचे व्यवहार हाताळले

देशातल्या नक्षल प्रभावित ९० जिल्ह्यांमये टपाल विभागाच्या १७८९ शाखा स्थापना

चौकट
गावांगावात पोहचले टपाल सेवेचे जाळे

ग्रामी‘ण विकास ‘मंत्रालयाच्या ‘मिशन अंत्योदय अंतर्गत केलेल्या ग्रामीण भागातील ‘मुलभुत सोयी सुविधांच्या उपलब्धीबाबत देशभरातील ग्रा‘मीण भागातील प्राथमिक सुविधा केंद्राचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ‘मिशन अंत्योदय २०१९ – २०  अंतर्गंत भारतातील ३५ राज्यातील ६ लाख ४८ हजार २४५ गावांतील ‘मुलभुत सुविधांच्या उपलब्धीबाबत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. भारतभरातील दुर्ग‘म भागातील गाव खेड्यातील १०१ कोटी ६ लाख २७ हजार ५०९ जनतेला सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले होते. देशभरातील ३५ राज्यातील टपाल कार्यालयांची उपलब्धी नोंदवली असता, त्यात १ लाख ४५ हजार २१९ गावांत टपालसेवा पोहचली असल्याची नोंद करण्यात आली आहे.
देशभरात टपाल खात्याची विभागणी २३ भागां‘ध्ये करण्यात आली आहे. यात म‘हाराष्ट्र सर्कलचा म्हणजे ‘महाराष्ट्र विभागाचा विचार करतांना या‘मध्ये म‘हाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा समावेश होतो. ‘महाराष्ट्रात पाच प्रभाग, ४० टपाल शाखा आहेत. तर गोव्या‘मध्ये १ प्रभाग आणि १ शाखा आहे. नवनवीन ठिकाणी लोकसंख्या वाढते त्यानुसार पोस्टाची कार्यालये तिथे स्थापन होतात. डोंगराळ भागात ५०० लोकसंख्येसाठीही पोस्ट ऑफीस उभारले जाते.

इन्फाे बाॅक्स
टपाल सेवेची सुरूवात

भारतातील टपाल सेवा इंग्रजांनी सुरू केल्यानंतर आजपर्यंत त्यात अनेक बदल घडून आले आहेत. सध्याच्या टपालव्यवस्थेची सुरूवात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात १६८८ ‘मध्ये ‘ुंमुंबई आणि ‘मद्रास येथे कंपनी पोस्टाची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या पत्रांची ने – आण होई. पुढे १७७४ ‘मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. भारतातील ‘मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्या‘ माफर्ङ्र्त (डिपार्ट‘मेंट ऑफ पोस्ट्स अ‍ॅण्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅन्ड नावाने चालवली जाते. आधुनिक टपाल यंत्रणेची सुरूवात १ ऑक्टोबर १८५४ ‘मध्ये झाली. आज टपाल खाते टपाल सेवेव्यक्तिरीक्त बँकिंग, विमा आर्थिक व्यवहारासाठीचे ‘माध्यम‘ झाले आहे.
देशभर पसरलेल्या १ लाख ४५ हजार २१९ टपाल कार्यालयांमार्फरत  चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात माेठे जाळे आहे.

भारतभरात कार्यरत पोस्ट ऑफीस
पूर्ण भारत – १ लाख ४५ हजार २१९
जम्मू‘ काश्मीर – १२३३
हिमा‘चल प्रदेश – ३४८६
पंजाब – ३२९२
उत्तराखंड – २५९५
हरियाना – २६०३
राजस्थान – ८९९८
उत्तरप्रदेश – १४००८
बिहार -९९५५
सिक्की‘ – १७९
अरुणाचल प्रदेश – २०१
नागालॅन्ड – १८४
‘मनिपूर – ५२२
मीझाेराम  – ३३२
त्रीपुरा – ७९६
मेघालय – ७०३
आसाम – ४३५०
वेस्ट बंगाल – ८७१८
झारखंड – ३५३९
ओडीसा – ९१३१
छत्तीसगढ – ३५३५
‘मध्यप्रदेश – ८१९२
गुजरात – १२६६८
द‘मन अ‍ॅन्ड दिव – १०
दादर नगरहवेली – ३५
‘महाराष्ट्र -११४९५
आंध्रप्रदेश – ९१६०
कर्नाटका – ८७२२
गोवा – १९६
केरळ – १४९०
तामीळनाडू – ९३४८
पोंडूचेरी – ५८
अंदमान अ‍ॅन्ड निकोबार – ७०
तेलंगणा – ५३७९
लडाख – ६६

जिल्हानिहाय पोस्ट ऑङ्कीस
रत्नागिरी ७५१
अह‘मदनगर ६८७
पुणे ६७९
सातारा ६६२
नाशिक ५९६
जळगाव ५५४
कोल्हापूर ५०६
सोलापूर ४५०
रायगड ४४७
अ‘मरावती ४२३
चंद्रपूर ४०५
सिंधुदुर्ग ३९७
नांदेड ३९३
सांगली ३९०
यवतमाळ ३२७
बुलढाणा ३२२
औरंगाबाद ३१४
बीड ३०१
उस्नमानाबाद २५०
धुळे २४७
लातूर २४६
नागपूर २४२
गडचिरोली २२७
अकोला २२०
पालघर १८६
नंदुरबार १७३
वर्धा १७१
जालना १७०
गोंदिया १५७
भंडारा १४७
वाशिम १४३
परभणी १२४
ठाणे ११०
हिंगोली ७८

 

मनीषा मोहोड. नागपुर, महाराष्ट्र.
आय.डी.पी अॅन्ड आाय.एस.बी. डेटा जर्नलिझम रिसर्च फेलाे. 2021-22.