कोयत्याने वार करून पिंपरीत एकाचा खून

0
पिंपरी : टपरीवर थांबलेल्या नंदू चव्हाण (वय 39, रा. सांगवी) या तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याने वार करून खून केला. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमारास अजंठानगर येथे घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. नंदू सेल्समन होता. दुपारी तीनच्या सुमारास तो अजंठानगर येथील हुंदाई शोरूमच्या मागच्या बाजूला एका टपरीवर सिगारेट पिण्यासाठी थांबला होता. सिगारेट पित असताना एका दुचाकीवरून दोघेजण आले. अचानक त्यांनी चव्हाण वर कोयत्याने सपासप वार केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. निगडी पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.
Copy