कॉर्पोरेशन बँकेच्या शाखेवर दरोडा; गोळीबारात कॅशियरचा मृत्यू

0

दिल्ली : दिल्ली येथील खैरा गावातील कॉर्पोरेशन बँकेच्या शाखेवर शुक्रवारी दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बँकेच्या कॅशियरचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. यानंतर चोरट्यांनी बँकेतील दोन लाखांची कॅश घेऊन पळ काढला.

या दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये दरोडेखोऱ बँकेत शिरताना दिसत आहेत. बँकेत शिरल्यानंतर त्यांनी अगोदर सुरक्षारक्षकाची बंदूक हिसकावून घेतली. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून सर्वांना एका कोपऱ्यात बसवले. मात्र, बँकेचे कॅशियर असलेल्या संतोष कुमार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. संतोष कुमार हे भारतीय वायूदलातील निवृत्त कर्मचारी आहेत. प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी त्यांच्या छातीत गोळी मारली. यानंतर दरोडेखोर कॅश घेऊन फरार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस बँकेत पोहोचले तेव्हा संतोष कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने दरोडेखोरांचा तपास सुरु केला आहे. दरोडेखोरांनी बँकेतील पैशासोबत सुरक्षारक्षकाची बंदुकही चोरून नेली आहे.

Copy