BREAKING: कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवणार; आरोग्यमंत्र्यांची माहिती

0

कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यासोबत बैठक

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या बंद करण्याची विनंती करण्यात आली होती. ती विनंती कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनाच्या व्यवस्थापनाने मान्य केली असून आता कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवण्यात येणार आहे. वर्क टू होमची संकल्पना राबविण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ-मोठ्या कंपन्यांच्या मालकांसोबत आणि व्यवस्थापनासोबत आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली असता त्यांनीही मोफत औषध पुरवठा करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Copy