कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दिवसा स्वप्न बघत आहेत – अमित शहा

0

जयपुर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी दिवसा स्वप्न बघत आहेत .वर्ष 2014पासून देशातील निवडणुकीचा इतिहास कांग्रेसला दूरबीन घेऊन बघावा लागत आहे.असे अमित शाह यांनी म्हंटले आहे. जयपुर मधील एका कार्यक्रमात शाह बोलत होते.

अमित शहा म्हणाले की, केंद्रामध्ये कॉंग्रेसचे सरकारअसताना घुसखोरी वाढली होती. सर्व अंतरराष्ट्रीय सीमामधून घुसखोरांची संख्या वाढली होती. त्याचे कारण कॉंग्रेस घुसखोरांना वोटबैंक समजते. परंतु भाजपा सरकारने एनआरसी आणल्यामुळे 40 लाख घुसखोरांना वापस पाठवण्यात आले. यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनीने लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ घातला. पुढे शहा म्हणाले की, 2018 ला राजस्थानमध्ये भाजपाला सरकार बनवू द्या, आणि केंद्रात 2019 ला मोदींची सरकार निवडून द्या, कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एक-एक घुसखोराला बाहेर काढण्यात येईल असे शहा यांनी सांगितले.

Copy