कॉंग्रेस अध्यक्षपदाचा तिढा; व्हर्च्युअल बैठकीला सुरुवात

0

नवी दिल्ली: कॉंग्रेसमध्ये अध्यक्ष पदाचा तिढा सोडविण्यासाठी आज देशातील कॉंग्रेस नेत्यांची एक बैठक बोलविण्यात आली आहे. ही व्हर्च्युअल बैठक आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस अध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे? सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्यास संमती दर्शविली आहे, तर राहुल गांधी यांचा अध्यक्षपद घेण्यास नकार असल्याने कोणाकडे हे पद जाते? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

काही नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी पत्र पाठवून अध्यक्ष बदलण्याची मागणी केली. गांधी घराण्याव्यतिरिक्त व्यक्ती अध्यक्ष पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र यावरून कॉंग्रेसमध्ये मोठी गटबाजी होत असल्याचे दिसून आले आहे. काहींनी अध्यक्षपद गांधी घराण्याकडे असावे अशी मागणी केली आहे तर काहींनी गांधी घराण्याव्यतिरिक्त पद द्यावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडतांना मोठी कसरत होणार आहे.