कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर; खान्देशातील ४ उमेदवार !

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. दरम्यान आज कॉंग्रेसची पहिली उमेदवारांची यादी जाहीर झाली. ५१ उमेदवारांची पहिली यादी कॉंग्रेसने जाहीर केली आहे. यात खान्देशातील चार उमेदवारांचे नाव आहे. के.सी.पाडवी (अक्कलकुवा), पद्माकर वळवी (शहादा), शिरीष सुरूपसिंग नाईक (नवापूर), शिरीष चौधरी (रावेर) या चार जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर; खान्देशातील ४ उमेदवार ! 1

कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी उमेदवारांची घोषणा केली. दरम्यान आज शिवसेनेने १४ जणांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे.

Copy