कॉंग्रेसची अवस्था नवरदेव नसलेल्या वरातीसारखी-शिवराज सिंह

0

नवी दिल्ली-मध्य प्रदेश विधानसभेसाठी २८ रोजी मतदान झाले आता ७ डिसेंबर रोजी राजस्थान विधानसभेसाठी मतदान होत आहे. राजस्थान निवडणुकीच्या प्रचारार्थ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सभा घेतली. यात शिवराज सिंह यांनी कॉंग्रेसवर निशाना साधला. राजस्थानमधील जनतेला पुन्हा सत्ता देण्याचे आवाहन करत शिवराज सिंह यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला. राहुल गांधी यांना गेहू जमिनीच्या खाली येते की वर हे देखील माहित नाही ते काय राजस्थानचा विकास करणार असा टोला शिवराज सिंह यांनी लगावला.

कॉंग्रेस पक्ष हा नवरदेव नसलेल्या वरातीचा पक्ष असल्याची खोचक टीका देखील यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी केली. देशातील सर्वच राज्यात कॉंग्रेसची हीच स्थिती आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट, अशोक गेहलोत सत्तेसाठी खोटे आश्वासन देत असल्याची टीका शिवराज सिंह चौहान यांनी केले.