कॉंगेस अंतर्गत वादामुळे जर्जर: संजय राऊत

0

मुंबई: कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी कॉंगेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून गांधी परिवारा बाहेरील व्यक्ती कॉंगेस अध्यक्ष व्हावा अशी मागणी केली होती. मात्र काही नेत्यांनी गांधी घराण्यातील व्यक्तीच अध्यक्ष राहावेत असे मत व्यक्त केले. यावरून कॉंग्रेसमध्ये अंतर्गत मतभेत उघड झाले. या प्रकारातून कॉंगेसच्या प्रतिमेला धक्का लागला आहे. दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. कॉंगेस हा सर्वात जुना पक्ष आहे. सत्तेत असतांना आणि विरोधी पक्षातही कॉंगेसने मोठी कामगिरी केली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता कॉंगेसकडे पूर्वीचे वैभव राहिलेले नाही. कॉंगेस अंतर्गत वादामुळे जर्जर झाले आहे या शब्दात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॉंगेसने अंतर्गत मतभेत दूर करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. देशाला एका मजबूत विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. कॉंगेसमधून अनेक नेते बाहेर पडले आहेत, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न कॉंगेस नेतृत्त्वाने करावे असेही संजय राऊत यांनी सांगितले.

कॉंग्रेसला गांधी कुटुंबीयांशिवाय पर्याय नाही. काँगेसला कायमस्वरूपी नेतृत्वाची गरज असून २३ नेत्यांनी पाठविलेले पत्र देखील योग्य आहे असेही त्यांनी सांगितले.

कॉंग्रेसमधील अंतर्गत वादाचा परिणाम राज्यातील सरकारवर होणार नाही असेही राऊत यांनी सांगितले.