कै. रायसिंग भादले यांचे कार्य ऐतिहासिक

0

कै. रायसिंग भादले यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी माजी आ.शिरीष चौधरी यांचे प्रतिपादन

चोपडा (प्रतिनिधी)- आदिवासी सेवक कै. रायसिंग फुगा भादले यांचे आदिवासीचे कार्य हे ऐतिहासिक कार्य असून त्यांचा कार्याला कधीही विसरता येणार नाही, असे प्रतिपादन रावेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले.
सत्रसेन येथील रहिवाशी तथा आदिवासी सेवक स्व. रायसिंग फुगा भादले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त व त्यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी बोलत होते.
पुतळा अनावरण सोहळा रावेरचे माजी आ. शिरीष चौधरी व शिरपूचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते झाला. सत्रासेन येथील आदिवासी आश्रम शाळेतील भव्य पटांगणात हा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. जगदीशचंद्र वळवी, कृउबास संचालक संतोष धोंडू पाटील, ग.स.चे संचालक तुकाराम बोरोले, ए.डी.माळी, आशिष गुजराती, टी.आय. देवेंद्र यांची उपस्थिती होती. धनाजी नाना चौधरी सेवा मंडळ या संस्थेची स्थापना स्व. रायसिंग भादले यांनी सत्रासेन या गावी सन १९७२ साली केली. सन १९८३ पासून उमर्टी येथे प्राथमिक आश्रम शाळा, बोरअजंटी येथे शाळा व महाविद्यालय सुरू केले व नुकतेच सुरू केले असून उत्तम प्रकारे चालवित या संस्थेचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. म्हणून आदिवासी त्यांच्या कार्याला कदापी विसरू शकत नाही, असे ऐतिहासिक कार्य स्व. भादले यांचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिरपूर येथील आमदार काशिराम पावरा यांनी सांगितले की, आदिवासी समाजाच्या वेदना व दु:ख स्वर्गीय रायसिंग भादले यांनी तळागाळातील समाजबांधवांच्या हितासाठी त्यांनी सदैव तत्पर राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या. त्यांच्या या चांगुलपणाचा वारसा आता ज्ञानेश्‍वर भादले, रविंद्र भादले परिवार चालवित असल्याचे सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, माजी आ. कैलास पाटील, माजी जि.प. सदस्य इंदिराताई पाटील यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली.

दोन क्विंटल वजनाचा पुतळा
आदिवासी सेवक स्व. रायसिंग फुगा भादले यांचा पुतळा हा ६ फुट उंचीचा आहे. तर वजन सुमारे २ क्विंटल एवढे आहे. तसेच सर्वशाळामध्ये अडीच फुटाचे पुतळे देखील हस्तांतरीत करण्यात आले. राजस्थान येथून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. सत्रासेन, उमर्टी, बोरअजंटी या तिन्ही संस्था मिळून जवळजवळ तीन हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात तर ११६ कर्मचारींचा येथे स्टाफ आहे. यावेळी धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भादले, सचिव ज्ञानेश्‍वर भादले, नरेंद्र भादले, जितेंद्र भादले, परमवीर भादले, धंनजय भादले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी.एस. पवार, विनोद पाटील यांच्यासह शिक्षक,मुख्याध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Copy