केळी ट्रक उलटला : रावेरातील दोघा मजुरांचा मृत्यू

0

रावेर : केळी भरून रावेरकडे येणारा ट्रक अजंदा-रावेर रस्त्यावरील पुलावरुन खाली नाल्यात उलटून झालेल्या अपघातात दोघा मजुर युवकांचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. केळी भरून रावेरकडे येत असलेला ट्रक (आर.जे.17 जी.1080) हा बुधवारी रात्री अजंदा-रावेर रस्त्यावरील नवीन विश्रामगृहाच्या मागे असलेल्या नाल्यावरील पुलावरुन पलटी होवून नाल्यात पडला. या अपघातात ट्रकमधील सागर सुरेश सुरवाडे (23) व राहुल महेंद्र गजरे (21 दोन्ही रा.पंचशील नगर, रावेर) या दोन्ही मजूरांचा ट्रकखाली दाबले गेल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलिसात योगेश रवींद्र गजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. अपघात घडल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळा वरुन पलायन केले. घटनास्थळी रात्री पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक हे करीत आहेत.