केळी उत्पादकांचे पैसे बुडवणार्‍यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद व्हावी

0

रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींची मागणी

रावेर- परराज्यातील व्यापार्‍यांकडे शेतकर्‍यांचे केळीचे प्रचंड पैसे अडकतात त्यासाठी राज्य शासनाने हमी घ्यावी अथवा कायदा दुरुस्त करून पैसे बुडवणार्‍या व्यापार्‍यांना कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समित्यांच्या बैठकीत रावेर बाजार समितीचे सभापती निळकंठ चौधरी यांनी केली. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथील झांबरे पॅलेसमध्ध्ये झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार मोहिते पाटील होते. महाराष्ट्रभरातील 307 बाजार समित्यांचे सभापती सदस्य उपस्थित होते. यावेळी चौधरी यांनी रावेर बाजार समितित काम करतांना येणार्‍या अडी-अडचणी संदर्भात या सभेत विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी पणन संचालक दीपक चावरे, सुनील पाटील, रावेर बाजार समिती संचालक पितांबर पाटील, गोंडु महाजन आदी उपस्थित होते.

Copy