केर्‍हाळ्यातील कीर्तनकारांचा स्वाईन फ्लूने मृत्यू

0

रावेर – तालुक्यातील केर्‍हाळे गावातील कीर्तनकार रघुनाथ बाबूराव पाटील (58) यांचा 6 रोजी रात्री स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादच्या एका रुग्णालयात घडली. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने स्वाईन फ्लूच्या लागणची तपासणी केली असता आजार निष्पन्न झाले. तालुक्यात गेल्या 40 वर्षांपासून वारकरी सांप्रदायाला स्वत:ला वाहून घेतलेल्या पाटील यांच्या अकाली निधनाने भजनी मंडळ व सांप्रदायातील लोकांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, वाघोडचे आरोग्याधिकारी डॉ.चंद्रकांत पाटील यांनी रघुनाथ पाटील यांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत तसा अहवाल आल्याचे सांगत कुटुंबियांना प्रतिबंधात्मक औषधांचा पुरवठा वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आल्याचे सांगितले.

Copy