केमेस्ट्री अ‍ॅप्टिट्युड टेस्टच्या विजेत्यांना बक्षिस वितरण

0

फैजपूर । येथील धनाजी नाना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे उमविअंतर्गत विविध परिक्षा केंद्रांवर तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी केमेस्ट्री अ‍ॅप्टिट्युड टेस्ट घेण्यात आली. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. व्ही.एस. झोपे होेते. त्यांनी सांगितले की, काम करतांना उत्साह असायला पाहिजे म्हणजे माणूस यशस्वी होतो. विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करुन यश संपादन करावे. या परिक्षेत प्रथम क्रमांक चेतन सुतार व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर, द्वितीय क्रमांक उर्मिला तेली ध.ना. महाविद्यालय रावेर तर तृतीय धनराज महाजन स व प कॉलेज ऐनपूर यांचा गौरव सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षिस देवून करण्यात आला.

प्रशासनाकडून मदत करण्याचे आश्‍वासन
महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील एम.एस्सी भाग 2 चा विद्यार्थी लतेश भंगाळे हा सेट परिक्षा उत्तीर्ण झाला. त्याचा गौरव पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी ही परिक्षा विद्यापीठ स्तरावर न घेता राज्य स्तरावर घ्यावी. यासाठी संस्था व प्रशासन यांच्याकडून योग्य ती मदत केली जाईल.

याप्रसंगी व्हा. चेअरमन प्रा. के.आर. चौधरी, सचिव प्रा. एम.टी. फिरके, प्रा. पी.एच. राणे, डॉ.प्रा. ए.के. पाटील, उपप्राचार्य प्रा. ए.जी. सरोदे, प्रा. डी.बी. तायडे, प्रा. ए.आय. भंगाळे, प्रा. यु.एस. जगताप उपस्थित होते. प्रास्ताविक परिक्षा समन्वयक प्रा. ए.जी. सरोदे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. लता पाटील यांनी तर आभार प्रा. राकेश तळेले यांनी मानले.