‘केदारनाथ’ चित्रपटा विरोधात गुजरात हायकोर्टात याचिका

0

मुंबई : बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडथळे काही कमी होईना. आंतरराष्ट्रीय हिंदू सेना संघटनेने या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. गुजरात हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे आणि याचं पुढच्या आठवड्यात त्यावर सुनावणीची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे या चित्रपटात केदारनाथ या हिंदू धर्मीयांच्या पवित्र ठिकाणी नायक – नायिकेचा किसिंग सीन दाखवण्यात आला असून त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार याचिकाकर्त्याने केली आहे.

Copy