केजरीवालांच्या जनता दरबारात तरुणाकडे सापडली पिस्तुल; तरुणाला अटक

0

नवी दिल्ली-दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेकदा हल्ले झाले आहे. मागित आठवड्यात एका व्यक्तीने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली होती. हे प्रकरण अजून ताजे असतांना आज केजरीवालांच्या जनता दरबारात एका तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आरोपी तरुणाकडे चौकशी करत आहेत.

मोहम्मद इमरान असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तपासणीदरम्यान त्याच्या खिशात पिस्तुलगी गोळी सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत १२ अन्य इमाम आणि मौलवी हे देखील होते. हे सर्व दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी अशी शिफारस करण्यासाठी जनता दरबारात गेले होते अशी माहिती आहे. मात्र, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरची पावडर; संबधित सुरक्षारक्षकांडून ताब्यात

Copy