केजरीवालांच्या आपला केंद्राचा झटका

0

नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्रालयाने आम आदमी पक्षाला नोटीस पाठवली असून पक्षाला मिळत असलेल्या देणग्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. ही नोटीस 3 मार्च रोजी बजावली असून 15 दिवसांच्या आतमध्ये विदेशी देणग्यांबाबत माहिती देण्यात यावी, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

आम आदमी पक्षाला निधी देणारी व्यक्ती वा कंपनीचे नाव आणि दिलेली रक्कम तसेच संबंधित कंपनीचे शेअर होल्डर्स आणि फॉरेने इक्विटी याबाबतही माहिती द्यावी लागणार आहे. गृहमंत्रालयाकडून 3 मे रोजी पाठवलेली नोटीस पक्षाला शुक्रवारी मिळाली आहे. यापूर्वी आम आदमी पक्षाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात दिलेली माहिती आणि आकडेवारी यात कोणतीही तफावत आढळून आलेली नाही, असे गृहमंत्रालयाने फेब्रुवारी 2015 मध्ये उच्च न्यायालयात सांगितले होते. मात्र, आता ही नोटीस बजावण्यात आली आहे.

ही नोटीस पाठविण्यात आल्यानंतर आम आदमी पक्षाने यासंदर्भात आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, फेब्रुवारी 2015 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयानेच आपला मिळणार्‍या पक्षनिधीमध्ये कोणताही गैरप्रकार नसल्याचे दिल्ली हायकोर्टात सांगितले होते. परदेशातून मिळणार्‍या निधीतही कोणत्याही प्रकारे नियमभंग झालेला नाही, असेही तेव्हा गृहमंत्रालयाच्या वकिलांनी म्हटले होते. आपने केवळ भारतीय नागरिकांकडूनच देणगी घेतली आहे, असेही तेव्हा स्पष्ट झाले होते. असे असताना आता तेच गृह मंत्रालय पुन्हा पक्षनिधीचा तपशील का मागत आहे? अशी प्रतिक्रिया आपचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे. त्यावेळी न्यायालयात सांगून क्लीन चिट देणारे गृहमंत्रालय आता पुन्हा या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे सांगत आहे. आपला लक्ष्य करण्यासाठीच हे सगळं चाललं आहे आणि हे भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत दुःखदायक आहे, असेही राघव चढ्ढा म्हणाले.