केंद्र शासनाने मोफत धान्य त्वरित वितरित करावे

1

माजी मंत्री आ. गिरिष महाजन यांची मागणी

जामनेर। केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जवळपास 80 कोटी जनतेसाठी माहे एप्रिल ते जून 2020 करिता प्रतिव्यक्ती प्रतिमहा पाच किलो धान्य मोफत वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेचा सर्व आर्थिक भार केंद्रशासन करणार आहे. आपल्या राज्यामध्ये अंत्योदय योजना प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना धान्य वितरीत केले जाते. ते धान्य त्यांनी उचल केल्यानंतरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य या लाभार्थ्यांना देण्यात यावे, अशा प्रकारचे आदेश अन्न नागरी पुरवठा विभागाने 31 मार्च 2020 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या आहेत. आदेश हे पण आवश्यक आहेत. कारण लॉकडाऊनमध्ये गरिबांचे पोट हातावरती आहे. अशा मोलमजुरी करणाऱ्या गरिबांना त्यांच्याकडे आज रोजी रोजगार नाही. म्हणून त्यांची उपासमार होत आहे. हा विचार करून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केंद्र शासनाने जाहीर केलेला आहे. त्यामुळे या गरीब मजुरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत धान्य कोणत्याही अटी विना तातडीने वितरित करावे, अशी मागणी माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी केेली आहे. राज्यातील विशिष्ट आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता गोरगरिबांना मोफत धान्य वितरण करण्याबाबत राज्यात निर्माण झालेली विशेष आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता सामान्य गोरगरीब जनतेला रोजगार राहिला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.लाभार्थ्यांना प्रधानमंत्र्यांनी गरीब कल्याण योजने अंतर्गत गोरगरीब मजुरांना विनाअट तातडीने धान्य वितरण करण्याची योजना जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगाने आ. गिरीश महाजन जामनेर यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नागरी पुरवठा मंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव यांना राज्यातील गोरगरीब मजुरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य कोणत्याही अटी विना वितरित करावे, अशी पत्राद्वारे मागणी केली आहे.