केंद्र शासनाच्या योजनांच्या अंंमलबजावणीसाठी शनिवारी बैठक

0

महापौरांचा पुढाकार ; आयुक्तांना दिले पत्र

जळगाव : केंद्र सरकारच्या अमृत योजना, मलनिस्सारण योजना, घनकचरा व्यवस्थापन, फेरीवाला धोरण, ग्रीन फंड, प्रधानमंत्री आवास योजनेची शहरात कठोर अंमलबजावणीसाठी महापौर भारती सोनवणे यांनी खा.उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी शनिवारी दि.21 रोजी सकाळी 11 वाजता मनपात बैठक घेण्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत महापौरांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.

केंद्राकडून सध्या शहरात राबविण्यात येत असलेल्या योजनांची सद्यस्थिती महापौर भारती सोनवणे यांनी खा.उन्मेष पाटील यांना अवगत करून दिले. तसेच केंद्राच्या माध्यमातून शहर विकासासाठी काय करता येईल, कशाप्रकारे निधी मिळवता येईल यावर देखील महापौरांनी चर्चा केली. जळगाव शहरात केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जात आहे याची सर्व माहिती घेऊन पुढील निर्देश देण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता मनपात सर्व योजनांच्या अधिकार्‍यांची बैठक बोलविण्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत इतर देखील महत्वपूर्ण बाबींवर चर्चा होणार आहे.