Private Advt

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या जळगाव जिल्ह्यात

जळगाव : जलसंपदा विभागाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मुलीच्या विवाह समारंभासठी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रविवार, 20 मार्च रोजी जळगावात येत आहेत. रविवारी दुपारी 3:30 वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते जामनेर येथे प्रस्थान करतील व तेथून हिवरखेडा येथे माजी मंत्री महाजन यांच्या मुलीच्या विवाह समारंभास उपस्थिती देतील. तेथून 5.55 वाजेदरम्यान वाजता जळगाव विमानतळावर आगमन, त्यानंतर लगेचच 6 ते 6.30 वाजेदरम्यान जळगाव विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संदर्भात आढावा बैठक घेतील तर 6.30 वाजेनंतर विशेष विमानाने नागपूरकडे गडकरी प्रस्थान करणार आहे.