केंद्राचा मोठा निर्णय: मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नामकरण “शिक्षण मंत्रालय”

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्राबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. नवीन शैक्षणिक धोरण देखील केंद्र सरकारने जाहीर केले आहे. आज बुधवारी याची अधिकृत घोषणा दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल करणार आहेत. दरम्यान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नावामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. हे नाव बदलून त्याचे शिक्षण मंत्रालय असे नामकरण करण्यावर केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून लवकरच याची अधिकृत घोषणा करणार आहे.

केंद्रीय कॅबिनेटची आज बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत मानुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून ते पुन्हा शिक्षण मंत्रालय करण्यात आले आहे. २९ जुलै रोजी याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत नव्या शिक्षण धोरणालाही मंजूरी देण्यात आली.

Copy