कॅशलेस व्यवहारासाठी उमवि परीसरात जनजागृती

0

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कॅशलेस व्यवहारासंदर्भात विद्यापीठ परिसरात जनजागृती मोहिम हाती घेतली असून परिसरातील एका चहा स्टॉलला शुक्रवारी कुलगुरु व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी भेट देवून चहाचा आस्वाद घेत कॅशलेस पेमेंट अदा केले. विद्यापीठाने एक पाऊल : डिजीटल साक्षरतेकडे हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यापीठ परिसरातील उपहार गृहांवर कॅशलेस व्यवहार व्हावेत याबाबत कॅन्टीन चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्यक्षात कॅशलेस व्यवहार कसे सुरू आहेत हे पाहण्यासाठी शुक्रवारी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी व्यवस्थापन परिषद सदस्यांसह चव्हाण टी स्टॉलला भेट दिली व चहा घेतला. या चहाचे बील कुलसचिवांनी मोबाईल अ‍ॅपद्वारे अदा केले. या स्टॉलवर बहुसंख्य विद्यार्थी कॅशलेस व्यवहार करून सेवा घेत आहेत. यावेळी बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर, वित्त व लेखाअधिकारी डॉ.बी.डी.कज्हाड, सहसंचालक डॉ.केशव तुपे, परीक्षा नियंत्रक प्रा.डी.एन.गुजराथी, कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन उपस्थित होते.