कृषी विधेयकाबाबत देशात विरोधकांकडून चुकीचा प्रचार

0

जळगाव: शेतकर्‍यांच्या भल्यासाठी मंजूर तिन कृषी विधेयकासंदर्भात विरोधकांकरून चुकीचा प्रचार सूरू असून मूठभर दलाल काळा बाजार करणार्‍या प्रवृत्तीकडून शेतकर्‍यांची होणारी दिशाभूल दूर होणे गरजेचे आहे. ज्या प्रवृत्ती आंदोलन चिघळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना उघडे पाडण्यासाठी आणि विधेयकाबाबत वस्तुस्थिती आपल्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी आज पत्रकार
परिषदेत दिली.

आज भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर ना. भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमूख सुरेश धनके,किसान मोर्चा महानगर अध्यक्ष हेमंत खडके, ज्येष्ठ नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, जळगाव लोकसभा विस्तारक सचिन पान पाटील,महानगर प्रसिद्धी प्रमूख मनोज भांडारकर, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी, महानगर कार्यालय मंत्री प्रकाश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

Copy