कृषी गणनेला नकार देत तलाठ्यांची निदर्शने

0

धुळे । तलाठ्यांकडे संगणकीकृत 7/12 सह अद्ययावत नोंदणीचे काम प्रलंबित असून त्यातच कृषी गणनेचे काम तलाठ्यांना देण्यात आल्याने हे काम नाकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने घेतला आहे. त्यानुसार या कामाला विरोध दर्शविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत तलाठ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत तलाठी संवर्गाकडे डिजीटल इंडिया भूमिअभिलेख कार्यक्रमांतर्गत हस्तलिखीत 7/12 व संगणकीकृत 7/12 तंतोतंत जुळविण्याचे काम एडिट मोड्युल प्रणालीद्वारे सुरु आहे. हे काम अत्यंत व्यापक व वेळखाऊ स्वरुपाचे आहे. त्यातच आता कृषी गणनेचे काम तलाठ्यांना सोपविण्यात आल्याने तलाठ्यांवरील कामाचा बोजा वाढणार असल्याने 2तलाठी संघाच्या बैठकीत हे काम नाकारण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य तलाठी संघाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत प्रशासनाला निवेदनही दिले आहे.

यांनी दिले निवेदन
या निवेदनावर संघाचे अध्यक्ष एन.वाय.कुळकर्णी,सरचिटणीस वाय.आर.पाटील,राज्य सदस्य एस.बी.मोहिते, ए.ए.भामरे, बी.यु. पाटील,आर.एल.सोनार, पी.एस. वाघ, आर.पी.कुमावत, एस.पी.नेमाणे, एस.जी.सुर्यवंशी, बी.एन.बिरारी, आर.बी.राजपूत, पी.ए.राजपूत, एस.आर.पातुरकर, पी.ए.राजपूत, डी.ओ.इहावले, एम.एस.अहिरराव, पी.पी. ढोले, मनिषा ठाकरे आदींची नावे आहेत.