शेतकरी हितासाठी नाही तर राजकारणासाठी विरोधक एकत्र: रविशंकर प्रसाद

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने कृषी कायद्यात सुधारणा केली असून तीन विधेयके मंजूर केली आहे. या विधेयकाविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. उद्या ८ रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक पक्षांनी या आंदोलनाला पाठींबा देत उद्याच्या बंदलाही पाठींबा दिला आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज सोमवारी ७ रोजी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यात बदल करण्याची सूचना केली होती. २०१० मध्ये त्यांनी पत्र दिले होते. कॉंग्रेस नेत्यांनीही बदल करण्याचे सांगितले होते. मात्र आता कायद्यात बदल केले आहे तर ते शेतकरी विरोधी असल्याचे सांगतात. यावरून विरोधकांचा दुपट्टीपणा समोर आला आहे असा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले आहे.

‘तुम्ही बदल केले तर शेतकरी हिताचे आणि भाजप सरकारने केले तर शेतकरी विरोधी’ ओरड करणे हा विरोधकांचा दुटप्पीपणा आहे असे त्यांनी सांगितले.

Copy