कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भाजप मैदानात; देशभरात ७०० बैठका

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाला देशभरातील शेतकरी विरोध करत आहे. हे कायदे शेतकरी विरोधी असून तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील विशेषत: पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी दोन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहे. विरोधकांनीही यावरून केंद्र सरकारला लक्ष केले आहे. कृषी कायदे काळे कायदे असून ते रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी राष्ट्रपतींची भेटही घेतली आहे. दरम्यान आता भाजपनेही कृषी कायद्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात आज भाजप ७०० पत्रकार परिषद घेणार असून ७०० कॉर्नर बैठकाही घेणार आहे. यातून भाजप कृषी कायद्याचे समर्थन करणार आहे.

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे. शेतकऱ्यांना संधी निर्माण होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. विरोधकच शेतकरी विरोधी असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. केंद्र सरकारनेही हे कायदे मागे न घेण्याची भूमिका घेलली आहे.

Copy