Private Advt

कृषी उत्पन्न बाजार समितीतून दुचाकी लांबविली

जळगाव : औरंगाबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या एकाची 50 हजार रूपयांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरीचे सत्र कायम
जुना खेडीरोड परीसरातील विद्यानगर येथील संदीप दिनकर काळे (40) हे शनिवार, 12 मार्च रोजी ते पहाटे साडेपाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. यादरम्यान त्यांनी त्यांची दुचाकी (एम.एच.19 बी.झेड.5132) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीपाला विभागातील दुकानाच्या मागे उभी केली मात्र काम झाल्यानंतर काळे हे परत आल्यानंतर त्यांना दुचाकीची चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी संदीप काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक गणेश शिरसाळे करीत आहेत.