कुस्ती स्पर्धेत पंजाबचे वर्चस्व

0

एरंडोल। एरंडोल तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत प्रमुख मानाच्या लढतीत पंजाबच्या गणी पहेलवानचा विजय झाला. गणी पहिलवानने हरियाणाच्या मोनू पहेलवानाचा पराभव केला. एकवीस मिनिटाचा हा सामना अतिशय रंगतदार ठरला. गनी पहेलवान हा पंजाब केसरीचा मानकरी ठरलेला आहे. लढत पाहण्यासाठी सुमारे दहा हजार क्रीडा रसिक उपस्थित होते. स्पर्धेसाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटुंनी सहभाग घेतला. अनुभव पंचांच्या उपस्थितीत स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या गनी पहेलवानचा तीन लाख एक हजार रुपयांचे बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. भाजपाचे विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, सचिन चौधरी, विक्रीकर अधिकारी आर.एस.पाटील, मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष नरेंद्र पाटील राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, रवींद्र महाजन, प्रा.मनोज पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

आंतरराष्ट्रीय पंच: खान्देश हा कुस्तीचा आखाडा म्हणून मानला जातो. विविध सण, उत्सव तसेच कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. कुस्ती स्पर्धा मोठी असल्याने कोणतेही वाद उद्भवू नये याची काळजी आयोजकांनी घेतली होती.कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच राजेशकुमार व भूपेशकुमार यांनी काम पाहिले. कुस्ती स्पर्धेचे धावते समालोचन करण्यात आले. कुस्ती पाहण्यासाठी येणार्‍यांची संख्या मोठी असल्याने अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता.

160 कुस्त्या
एरंडोल शहरातील रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाच्या पटांगणावर कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे आखाडा पूजन काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत 160 कुस्त्या घेण्यात आल्या. लहान मुलांच्या कुस्तीपासून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. स्पर्धेत देशभरातून तसेच राष्ट्रीय पातळीवरील सुमारे चारशे कुस्तीपटू सहभागी झाले होते. जिल्ह्यातील अनेक कुस्तीपटुंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

मुलींनी देखील घेतला सहभाग
आज पर्यत प्रत्येक खेळात पुरुषांनीच वचक निर्माण केलेला आहे. कुस्ती म्हटले म्हणजे केवळ पुरुषांनीच हा खेळ खेळायचा अशी आजपर्यत समज होती. मात्र हा समज खोटा ठरत असून महिला देखील आज कुस्तीस्पर्धेत सहभाग घेऊन नावलौकीक कमवत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच प्रसिध्द महिला कुस्तीपटु गिता फोगट यांच्या जीवनावर आधारीत दंगल सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे अनेक महिला कुस्तीपटुंना प्रेरणा मिळत आहे. एरंडोल येथे झालेल्या कुस्तीस्पर्धेत मुलींनी देखील सहभाग घेतला. नागरिकांकडून स्पर्धेत सहभाग घेणार्‍या मुलींचा कौतुक केला जात आहे.

यांची होती उपस्थिती
कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, भीमराव जाधव, देविदास मराठे, नितीन महाजन, विवेक पाटील, अशोक चौधरी, सनी जाधव, जाहीरोद्दिन शेख कासम, प्रा. एस.आर.पाटील, प्रा.डॉ. ए.आर.पाटील, ,डॉ.नरेंद्र ठाकूर, प्रा.मनोज पाटील, आशिर्वाद पाटील यांचेसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्पर्धा शांततेत पार पडण्यासाठी कुस्तीगीर संघाचे तालुकाध्यक्ष संजय महाजन, उपाध्यक्ष शेख रहीम शेख सफी,सचिव भानुदास आरखे यांचेसह संघाच्या पदाधिकार्‍यायांनी परिश्रम घेतले.