कुसुंब्यात प्रेमप्रकरणावरुन हाणामारी; 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव- तालुक्यातील कुसुंबा येथे प्रेमप्रकरणावरुन 27 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रोजी हाणामारी झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कुसुंबा येथील स्वामी समर्थ बैठक हॉलजवळील अक्षय भास्कर सोनवणे (वय 21) याने फिर्याद दिली. त्यांच्या घरासमोर शुभम कोळी, दीपक कोळी, भूषण कोळी आले. भूषण कोळी हा अक्षय सोनवणे यांचा भाऊ अमोल सोनवणे याला म्हणाला की, मी एका मुलीवर प्रेम करतो. तू आमच्या वाटेत येऊ नको. याबाबत अक्षय कोळी यांचा भाऊ समजावून सांगत होता. परंतु, अमोल यास शिवीगाळ करुन धमकी देत मारहाण केली. त्यानंतर संतप्त जमााने दरवाजा तोडला आणि घरात शिरुन मारहाण केली. यात सोनवणे बंधूू व त्यांचे आई-वडील जखणी झाले. तर घरातील संसारोपयोगी वस्तूंचीही तोडफोड करण्यात आली आहे. वस्तूंची तोडफोड केली. शेजारील रहिवाशांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी शुभम कोळी, दीपक कोळी, भूषण सुकदेव ठाकरे, संतोष उर्फ बब्या सुभाष कोळी, अक्षय दीपक जाधव, आकाश कोळी, भिकन कोळी व इतर तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.