कुसुंब्यात घरातून केेली 46 हजारांची दारू जप्त

0

धुळे। शहरासह जिल्ह्यातील हायवे लगतचे बार वॉईन शॉप बंद झाल्यानंतर अचानक अवैध दारू विक्री आणि तस्करीला ऊत आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी दारूच्या अवैध साठे आणि विक्री करणार्‍यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात कालरात्री पोलिसांच्या पथकाने छापा टाकून 46 हजाराचा दारूसाठा जप्त केला. तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या आदेशाने पीएसआय मोरे, पीएसआय कोळी, पोकॉ विश्‍वास हजारे, सचिन वाघ, सचिन माळी व मंगल पवार यांनी कुसुंब्यातील गली नंबर 3 मधील रहिवाशी कपिल जयराम चौधरी यांच्या घरावर छापा टाकला असता काळ्याबाजारात विक्रीसाठी लपवून ठेवलेली 46 हजार 850 रूपये किंमतीची देशी विदेशी दारूच्या बाटल्यांची खोकी आढळून आली. हा सर्वमाल तालुका पोलिसांनी जप्त करीत याप्रकरणी पो.कॉ.सचिन माळी यांच्या फिर्यादीवरून कपील जयराम चौधरी (35) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.