कुसुंब्यातील सलून व्यावसायीकाची संक्रांतीलाच आत्महत्या

भुसावळ/जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथील सलून व्यावसायीक असलेल्या तरुणाने संक्रांती सणाच्या दिवशीच गळफास घेत आत्महत्या केली. प्रमोद रवींद्र खैरनार (20) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवार, 14 रोजी दुपारी चार वाजता उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाने आत्महत्या करण्याचे ठोस कारण कळू शकले नाही.

सणालाच कोसळला दुःखाचा डोंगर
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे प्रमोद खैरनार हा आई, वडील व लहान भावासोबत वास्तव्यास होता. प्रमोदने दोन वर्षांपूर्वीच गावात सलूनचे दुकान टाकले होते. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. शुक्रवार, 14 जानेवारी रोजी सकाळी त्याचे आई, वडील व लहान भाऊ कामावर निघून गेले तर प्रमोद हा घरी एकटाच होता. याचवेळी त्याने राहत्या घरात छताच्या हुकाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Copy