कुसुंबा खुर्दला विवाहितेचा विनयभंग

0

रावेर- कुसुंबा येथील एका विवाहित 28 वर्षीय महिलेचा विनयभंग करीत मुलास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध्र रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथील एका 28 वर्षीय महिलेस शरीर सुखाची मागणी करीत तसे न केल्यास बदनामी करून मुलाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिल्याप्रकरणी कुसुंबा खुर्द येथील सचिन रमेश पाटील याच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गफुर शेख व जितु पाटील करीत आहे.

Copy