कुवेतहुन ‘ड्रॅगन फ्रुट’ फळ बाजारात दाखल

0

जळगाव (सपना पवार)। फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळ्याची चाहुल जाणवायला सुरूवात झाली असून या उन्हाची तिव्रता कमी करण्यासाठी बाजारा द्राक्षांची आवक व मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून अधिक प्रमाणात द्राक्षे अधिक प्रमाणावर असून यात तिन्ही प्रकाराला चांगली मागणी आहे. नाशिक, सातारा सांगलीसह तासगाव येथून द्राक्षांची मागणी अधिक होत असते. द्राक्षांमध्ये तीन प्रकार जळगाव जिल्ह्यात असून यात गोल, कॅप्सूल व काळे दाक्षे असे असून यात लांब (कॅप्सूल) द्राक्षांना बाजारात अधिक मागणी आहे.

ज्याचा मार्केटातील भाव किलोला 100 ते 120 पर्यतचा आहे. अनेक दुकानावर द्राक्षांचे भाव 80-90 पर्यंतवर येण्याची शक्यता आहे. नोटबंदी झाल्याने आगोदरचे दोन महिने हे पूर्ण मंदीचे होते. ग्राहकांकडे सुटे पैसे नसल्याने फळ खरेदीला अल्प प्रतिसाद होता. सुरूवातीला चालू चे दोन महिने ही संपुर्ण बाजारात मंदी आली होती. कॅशलेस झाल्याने सुट्यांची समस्या जवळपास संपली आहे. सुटयाची अडचण ही जाणवत नाही. पे-टीमची सुविधा झाल्याने गिर्‍हाइक ज्याचा पूर्णपणे वापर करत आहेत.

विविध प्रकारचे फळ दाखल

उन्हाळयाची तीव्रता सुरू झाल्याने बाजारात अनेक प्रकारचे फळ आले आहेत ज्यात आंबे पपई टरबुज तसेच नागपूर चे संत्रा मासंबी हे फळ बाजारात आले आहेत आंबा चे दोन तीन प्रकार बाजारात आले आहेत ज्यात गुलाबकस बेगनफळी, मद्रास केसर, रत्नागीरीचा आंबा हे आहेत तसेच एक नवीन आंबांचे प्रकार आले आहेत. यासोबतच ड्ेगन फ्रुट विविध पापुद्रे असलेला हा गुलाबी रंगाचे हे फ्रुट आहे 60 रू नंग या दराने त्यांची विक्री बाजारात होत आहे दिसायला अतिशय मोहक व चव ला आंबटगोड आहे कुवैतहुन हे फळ मांगविले जाते या फळामध्ये फॉस्फरस कॅल्शियम जीवनसत्व अ जीवनसत्व डी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे यामुळे अशक्तपणा येत नाही आरोग्यासाठी हे फळ फायदेशीर आहे.

आजचे युग हे धावपळीचे बनले आहे. आपली लाईफस्टाईल बदलल्याने खाणपाणात देखील बदल झाला आहे. यात फळांचे महत्व आजही टिकून आहे. फळांचे सेवन केल्याने आलेला थकवा कमी होत असतो. आरोग्याचा विचार करता फास्ट फुडपेक्षा फळांचे सेवन कधीही चांगले आहे. फास्ट ÷फुड खाण्याने पोटाचे आजार बळावू शकतात.
-रहीमभाई, फळ विक्रेता