कुलरचा लागला शॉक ; हनुमान नगरातील विवाहितेचा मृत्यू

0

जळगाव – उन्हाचा पारा वाढला आहे. उकाडा सहन होत नसल्याने अनेकांनी कुलर लावले आहेत. मात्र उकाडा दूर करणारे हे कुलर शहरात एका विवाहितेच्या जिवावर बेतले आहे. कुलरमुळे विजेचा जोरदार धक्क्याने सुनिता ज्ञानेश्वर कुमावत (वय-३२) रा. हनुमान नगर, या दिव्यांग विवाहितेचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली.

रामानंद नगर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता ज्ञानेश्वर कुमावत (वय-३२) रा. हनुमान नगर, वाघ नगर परीसर ह्या रात्री १० वाजेच्या सुमारास शौचालयातून बाहेर निघाल्यानंतर विद्यूत प्रवाह उतरलेल्या पत्र्याच्या कुलरला धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व छातीजवळ विजेचा धक्का लागल्याने ही घटना घडली. सदर विवाहितेस रेणूका (वय-१२) व मुलगा राज (वय-४), आई व दोन भाऊ असा परिवार आहे.