कुलभुषण जाधव प्रकरणाचे होणार लाईव्ह स्ट्रीमिंग

0

हेग: कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय पुढच्या वर्षी १८ ते २१ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुनावणी करणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या मुख्य न्याय विभागानं बुधवारी यासंबंधी एक आदेश जारी केलाय. यामध्ये, कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं जाहीर केलेल्या पत्रकात, ‘मागणीनुसार, सुनावणीचं न्यायालयाच्या वेबसाईटसोबतच ऑनलाईन वेब टीव्ही, संयुक्त राष्ट्र ऑनलाईन टीव्ही चॅनलवर इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाईल’ असे सांगितले आहे.

पाकिस्तानी सैन्य न्यायालयानं गुप्तहेरी आणि दहशतवादाच्या आरोपांत ४८ वर्षीय कुलभूषण जाधव यांना एप्रिल २०१७ रोजी मृत्यूदंड ठोठावला होता. याच वर्षी भारतानं मे महिन्यात या निर्णयाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Copy