कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा !

0

कुलगाम: भारतीय जवानांनी जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चमक झाली. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला आहे.

कुलगामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. जवानांनी या परिसरात शोध घेतला. पोलीस, आर्मी आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रित केलेल्या कारवाईमध्ये दोन दहशतावदी ठार झाले आहेत. दोघांचाही संबंध हिजबुल या संघटनेशी आहे. एकाचे नाव अली भाई असून दुसऱ्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. चकमक झालेल्या ठिकाणहून शस्त्रास्र आणि इतर सामान जप्त करण्यात आले आहे.