कुर्‍ह्यात जुगाराचा डाव उधळला : 35 जुगारी जाळ्यात

मुक्ताईगर : कुर्‍हा-धुपेश्‍वर मार्गावरील हॉटेल राजेच्या वर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी सायंकाळी धाड टाकत तब्बल 51 जुगार्‍यांना पकडले. आरोपींच्या ताब्यातून दोन लाख 59 हजार 220 रुपयांची रोकड, सहा चारचाकी वाहने, दहा दुचाकी, 51 मोबाईल फोन मिळॅन एकूण 34 लाख 53 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यांनी केली कारवाई
ही धाडसी कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, बाजारपेठचे सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, वरणगावचे प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक नितीन गणपुरे, सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, हवालदार अय्याज सय्यद, पोलिस नाईक समाधान पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, हेमंत जांगडे, प्रकाश कोकाटे, विजय अहिरे तसेच आरसीपी क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली.