कुर्‍ह्यातील युवकाची आत्महत्या : कारण गुलदस्त्यात

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील कुर्‍हा येथील संतोष कैलास हिरोळे (30) या युवकाने काहीतरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. बुधवार, 26 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. विषारी औषध सेवन केल्यानंतर त्यास अत्यवस्थ अवस्थेतन मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवत असतानाच रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. योगेश कैलास शिरोळे यांच्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुधाकर शेजोळे करीत आहेत.