Private Advt

कुर्‍हेपानाचे गावातील शेतमजूर बेपत्ता

भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील दशरथ शेनफडू धांदरे (75) हे 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता अचानक घरातून बेपत्ता झाले आहेत. शरीराने मध्यम, डोळे भुरे, उंची चार फूट, रंग सावळा, चेहरा लांबट, नाक सरळ, अंगात धोतर, फुलबाहीचा शर्ट घातला आहे. या प्रकरणी जिजाबाई दशरथ धांदरे यांनी भुसावळ तालुका पोलिसात खबर दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. धांदरे यांच्याबाबत कुणाला काही माहिती असल्यास भुसावळ तालुका पोलिसांशी (02582-242199), 9923368629 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस नाईक गणेश गव्हाळे यांनी केले आहे.