कुर्‍हा-वढोदा उपसा सिंचन योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार

0

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची ग्वाही ; योजनेचा घेतला आढावा

मुक्ताईनगर- कुर्‍हा-वढोदा परीसरातील शेतीसाठी नवसंजीवनी ठरणार्‍या कुर्‍हा-वढोदा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एकच्या रीगाव, ता.मुक्ताईनगर येथील पंपगृहाला भेट देवून संबंधित अधिकारीवर्गाकडून योजनेच्या कामाचा आढावा माजी महसूल कृषी मंत्री आमदार एकनाथरावजी खडसे यांनी घेतला.
या योजनेची पाईपलाईन आणि विद्युत टॉवरच्या कामाला परीसरातील काही शेतकर्‍यांचा विरोध असल्याचे आमदार खडसे यांनी मध्यस्थी करून संबंधित शेतकरी बांधवांना योग्य मोबदला मिळवून दिल्यामुळे योजनेचे काम पूर्णत्वास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रसंगी आमदार यांनी ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेवून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे उपस्थित परिसरातील शेतकरी बांधवांना आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी तापी पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता चिनावलकर, कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे, शाखा अभियंता वैभव लखाडे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, ज्येष्ठ नेते पुरणमलजी चौधरी, भाजप तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, सरचिटणीस डॉ.बी.सी.महाजन, शिवाभाऊ पाटील, कपले, विनोद गवळे, पांडुरंग नाफडे आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

Copy