कुर्‍हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण जनजागृती

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्‍हा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परीषद घेण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंचावर गटशिक्षणाधिकारी जे.डी. पाटील, बी.सी महाजन, डी.ओ. पाटील, ओमप्रकाश चौधरी उपस्थित होते. उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास अनिल पांडे, पंकज पांडव, पुंडलिक कपले, डॉ. गजानन खिरडकर, प्रमोद पाटील, संजय अर्जुन पाटील, संजय पाटील, गजानन कवळे, नंदु खिरडकर, बंडू बोरसे, नरसिंग चव्हाण, दादाराव हिरोळे, गोपाल खानझोडे, प्रविण टेलर, के.के. कोळी, ग्रामविकास अधिकारी चिंचोरे, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.