Private Advt

कुर्‍हा गावातील बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह

मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्‍हा गावातील तरुण गेल्या तीन दिवसांपासून घरातून निघून गेल्याने त्याचा शोध सुरू असतानाच ग्रामपंचायतीच्या विहिरीत तरुणाचा शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. नितीन भारत दाते (35, कुर्‍हा) असे मयत तरुणाचे नाव आहे. अत्यंत हालाखीच्या परीस्थितीत मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा युवक करीत होता मात्र अचानक हा युवक बुधवारी संध्याकाळी घरी काहीही न सांगता बाहेर पडला व त्याचा कुटुंबियांकडून शोध सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी कुर्‍हा ग्रामपंचायतीच्या गावठाण विहिरीत या तरुणाचा मृतदेह आढळला. मयताचे काका राजू दाते यांनी पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हरीश गवळी करीत आहेत.