Private Advt

कुर्‍हाडदे शिवारात मक्याला आग एका लाखांचे नुकसान

जळगाव : वीज तारांवर शॉर्ट सर्किट झाल्यानंतर शेतातील मक्याला आग लागल्याने शेतकर्‍याचे एक लाखांचे आर्थिकन नुकसान झाले. ही घटनातालुक्यातील कुर्‍हाडदे शिवारात घडली.

एमआयडीसी पोलिसात आगीची नोंद
जळगाव कुर्‍हाडदे येथील सागर दादाजी नरोटे (28) यांचे कुर्‍हाडदे शिवारात तीन एकर शेती असून या शेतात त्यांनी मका लावलेला आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतावरुन गेलेल्या महावितरणच्या वीजतारांवर शॉर्टसर्किट होवून शेतातील मक्याला आग लागली. नेहमीप्रमाणे सकाळी शेतकरी सागर नरोटे हे शेतात येत असताना त्यांना मक्याला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी शेतातील इतर कामगारांची सोबत पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर आग विझली. या आगीत शेतातील एक एकरातील 40 क्विंटल वजनाचा व सुमारे एक लाख रुपये किंमतीचा मका खाक झाला. याबाबत शेतकरी सागर दादाजी नरोटे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील हे करीत आहेत.