कुरंगी येथे गावठी दारुचा अड्डा उध्वस्त

0

नांद्रा – कुरंगी येथील गिरणा नदी काठी आज सकाळी 7.30 च्या सुमारास चार ते पाच ठिकाणी पाचोरा पोलीसांनी अप्परपोलीस निरीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कुरंगी येथील गावठी दारुच्या हातभट्टीवर छापा टाकला त्यात 12 हजार 500 रूपयांचे गावठी दारुचे कच्चे पके रसायन व तयार दारू सह मिळून आल्याने आरोपी हरी शिवराम सोनवणे रा. हनुमंत खेडा (ता.एरंडोल) याचेवर दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. याकामी हरीश सोनवणे, गोकुल पाटील, किशोर पाटील, अमृत पाटील, प्रकाश पाटील, श्रीकांत गायकवाड, प्रताप पाटील, सुनिल पाटील उपस्थित होते.

Copy