कुणीही श्रेय घ्या, मात्र शेतकऱ्याला सुखी करा

0

मुंबई : आता सर्वच जण शेतकाऱ्यांबाबत कळवळा दाखवत आहेत. भाजप आणि शिवसेना हे सत्ताधारी आता मगरीचे अश्रू ढाळत आहेत. याचे श्रेय घेण्यासाठी आता सगळे सरसावत आहेत मात्र आम्हाला श्रेयाशी देणेघेणे नाही. कुणीही श्रेय घेवो मात्र शेतकरी सुखी व्हावा अशी आमची भूमिका असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि सेनेवर हल्लाबोल केला. तसेच बँकांच्या फायद्याचा विषय मुद्दा भरकटविण्यासाठी उपस्थित केला जात असल्याचे देखील पवार यांनी सांगितले.

पवार पुढे म्हणाले की, आज महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष विधान भवनाकडे लागले आहे. आम्ही 15 वर्ष सत्तेत होतो तेव्हा निर्णय घ्यायचो. मागण्यांसाठी आमचे आमदार वेलमध्ये यायचे नाहीत. भाजपने राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. राजकारण न कळण्याएवढे महाराष्ट्रातील शेतकरी दुधखुळे नाहीत, असा टोला अजित पवारांनी लगावला. शेतकरी कर्जमाफीची अचानक उपरती कुठून आली? आंदोलन काय करता कर्जमाफी करा असे सांगत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]

ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज 

[edsanimate_end]

कोणीही शब्दांचे खेळ करण्याचे प्रयत्न करु नये. आम्ही कर्जमाफीची मागणी श्रेयासाठी करत नाही. जाहिरातबाजी आणि घोषणाबाजी करुन प्रश्न सुटत नाही, असादेखील हल्लाबोल अजित पवार यांनी केला. सरकार गाजर दाखवत आहे. मात्र गाजर दाखवून प्रश्न सुटत नसल्याचे सांगत निवडणुकीचे निकाल लागले, आता जनतेचे प्रश्नांना अग्रक्रम द्या, अशी मागणीही अजित पवारांनी केली.