कुटूंब साखरपूड्याच्या तयारीत असताना तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या : अमळनेर शहरातील प्रकार

A young man in Amalner city committed suicide before the sugar rush अमळनेर : साखरपूड्याच्या पूर्वसंध्येलाच शहरातील देशमुख नगरातील तेजस मनोहर देशमुख या तरुणाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तरुणाने आत्महत्या का केली ? हे मात्र समजू शकले नाही.

विहिरीत उडी घेत आत्महत्या
तेजस मनोहर मगर (28, रा.देशमुख नगर) या तरुणाचा रविवारी साखरपूडा असल्याने घरात आनंदाचे वातावरण असतानाच शनिवारी सकाळी तरुणाने सलूनमध्ये जात असल्याचे सांगत घर सोडले मात्र जानवे शिवारात एका विहिरीत त्याने उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी हलवण्यात आला. दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तेजसचे लग्न ठरले होते व रविवार, 13 नोव्हेंबर रोजी त्याचा साखरपुडा होणार होता मात्र साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तेजसने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. जानवे पोलीस पाटील यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहे.