कुटूंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत 3 लाखाचे अनुदान वाटप

0

भुसावळ : राज्य शासन पुरस्कृत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या राष्ट्रीय कुटूंब अर्थ सहाय्य योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील 15 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे 28 रोजी आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते धनादेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार मिनाक्षी राठोड, नायब तहसिलदार, शहरी व ग्रामिण संजय गांधी शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

यांना मिळाला लाभ
यावेळी आमदार संजय सावकारे यांनी या लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेबाबत माहिती देऊन त्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील जिजाबाई रघुनाथ पाथरवट, कोकीळा अहिरे, निर्मला धनगर, उषा पाटील, मंगला सावकारे, सिंधू येवलकर, आशा भिल्ल, माधुरी अवचारे, जया मोरे, कोकीळा मावळे, सुमित्रा माळी, शिला तायडे, रुख्मिणी पवार, सरस्वती पवार, प्रमिला मोरे यांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे 3 लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.